विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी; आता एकच CET परीक्षा! | Maharashtra CET Exam
राज्यातील विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे.
राज्यात पुढील वर्षापासून एकच सामाईक CET परीक्षा आयोजित करण्यात येणार आहे. व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेत अधिक सुलभता आणि पारदर्शकता आणण्यासाठी CET विभागाने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
याअंतर्गत B.Ed, B.P.Ed आणि B.Ed-M.Ed या अभ्यासक्रमांसाठी घेतल्या जाणाऱ्या स्वतंत्र CET परीक्षा बंद करण्यात येणार असून, त्याऐवजी एकच सामाईक CET परीक्षा घेतली जाईल.
हा निर्णय शैक्षणिक वर्ष 2027-28 पासून लागू करण्यात येणार आहे.
नवीन पद्धतीनुसार, एकाच CET परीक्षेतील गुणांच्या आधारे तिन्ही अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.
17 May 2026
15 May 2026
13 May 2026
07 May 2026
24 Apr 2026
16 Apr 2026